Payal Books
Khidki By Subhash Avchat
Couldn't load pickup availability
१९७०च्या दशकात मी गोष्टी लिहिण्याच्या भानगडीत पडलो, त्याला कारणं दोन : एक : पुणे दोन : सत्यकथा. नाम्या ढसाळ, सुर्वे, तेंडुलकरांसारख्या माणसांनी पेटवलेली आग चोहीकडे पेटलेली आणि त्या गदारोळाच्या ऐन मध्यभागी मी ! शिवाय ज्यात त्यात लुडबुडणं ही माझी जन्मजात भोचक सवय ! - मग चित्रं काढता काढता डोक्यात चाळा सुरू झाला. जे दिसतं, वाटतं, जाणवतं, सापडतं; ते लिहून पाहावंसं वाटू लागलं; त्याच या गोष्टी ! - लिहिल्या त्याला पन्नास वर्षं उलटली, पण आजही कुचंबलेल्या माणसांच्या घुसमटीची कारणं आणि वेदनांचे बहाणे तेच आहेत. गोष्टी जशा सुचल्या तशा भराभर लिहीत गेलो. रचल्या नाहीत. सांगितल्या. या गोष्टींमधली माणसं अजून मला आजूबाजूला दिसतात !
