Payal Books
Khandoba खंडोबा By Nitin Thorat
Couldn't load pickup availability
# खंडोबा_महाराष्ट्राचं_कुलदैवत
मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करण्यासाठी महादेवांनी खंडोबाचा अवतार धारण केला, अशी महाराष्ट्राच्या कुलदैवताची अख्यायिका.
पण, खंडोबाची कथा एवढीच होती का ?
प्रभू रामचंद्र, देवकीनंदन श्रीकृष्ण, अंजनीसूत हनुमान यांच्यासारखं खंडोबाचंही बालपण असेल तर ?
काय होती खंडोबाच्या जगण्याची गोष्ट, त्याच्या संघर्षाची कथा ? आपलं सामर्थ्य उमगेपर्यंत काय घडलं असावं खंडोबाच्या आयुष्यात ?
म्हाळसा ही पत्नी असतानाही खंडोबाने बाणूला आपलंसं करण्याचं कारण काय असावं ?
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे,
खंडोबा देव होता की देवत्त्व लाभलेला परमवीर शूर योद्धा ?
अशा सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं देणारी ‘खंडोबा’ ही कादंबरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व वाचकांसाठी उपलब्ध करून देताना मनस्वी आनंद होतो आहे.
कुटुंबातल्या प्रत्येकाने वाचावी आणि प्रत्येक घरात असावी, अशी ही मराठी कादंबरी.
लेखक : नितीन थोरात
पाने : 328
किंमत 320
