Khandak |खंदक Author: Raju Nayak | राजू नायक
मातीचे अर्थकारण, मातीचे राजकारण मातीचे व्यवस्थापन अशा अवजड शब्दप्रयोगांच्या बडिवारात मातीच्या मायनाचा रूदनाचा वसा घेऊन ण्याचे धाडस राजू नायक यांनी केले आहे. यशाचे मौजमाप हिरव्या नोटांत मोजण्याची सवय लावून घेतलेल्या लब्धप्रतिष्ठितांच्या मांदियाळीला या रुदनाची आणि मायनाची आवश्यकता व प्रयोजन काय असा प्रश्न स्वाभाविकपणे पडावा. पण भूतकाळाच्या संचितावरच भविष्याची उभारणी होत असते याचे भान असलेल्या सुज्ञांना हे मातीचे मायन भावल्याशिवाय राहणार नाही. समष्टीचा आधिकार मौजक्यानीच ओरबाडून खाणे आणि या कृतीविरोधात आवाज उठवणार्यांची मुस्कटदाबी करत सामाजिक उतरंडीतली मोक्याची स्थाने अडवून ठेवणे म्हणजेच लोकतंत्र असे मानणार्या व्यवस्थैची लक्तरे वेशीवर टांगण्याची टगेगिरी नायक यांचे हे पुस्तक करते आहे. गोव्याच्या संथ समाजजीवनाच्या तळाशी, दृष्टीच्याही पल्याड साचून राहिलेल्या विद्रोहाच्या चिखलाला ढवळून पृष्ठभागावर आणण्याचे कामही ते करत आहे. आपल्या विपुल धनसामर्थ्याच्या बळावर राज्यातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अवकाशात गेली कैक वर्षे अढळस्थान बळकावलेल्या उच्चस्तरीयांचे खरे लालसी रूब अलभदपणे उघडे करत नव्या पिढ्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे श्रेयही या पुस्तकाला द्यावे लागेल. पत्रकाराची तिक्ष्ण आणि तटस्थ नजर आणि प्रवाहाविरूध्द उभे राहायची जिद्द या आज दुर्मिळ होत चाललेल्या गुणांनिशी गोव्यातील खाण व्यवसायाच्या विद्रुप चेहर्याला वाचकासमोर आणण्याचा हा खटाटोप विचारप्रवर्तनाबरोबर कृतीप्रवणतेलाही साद घालेल यात शंका नाही.