Skip to product information
1 of 2

Payal Books

Kedarnath by Prakash koyade केदारनाथ प्रकाश सुर्यकांत कोयाडे

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 390.00 Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Kedarnath by Prakash koyade केदारनाथ प्रकाश सुर्यकांत कोयाडे

जीवन मृत्यूच्या संघर्षात मृत्यूवर विजय मिळवणारा प्रवास म्हणजे केदारनाथ..
केदारनाथ मध्ये आलेल्या प्रलयात कित्येक लोकांनी हे भीषण वास्तव अनुभवलेल आहे. केदारनाथच्या दर्शनासाठी एक डॉक्टर, त्याचा मुलगा व पत्नी गेलेले आहेत. डेहराडून मध्ये त्याच्या मित्राच ही कुटुंब आहे व ते ही सोबत दर्शनासाठी जातात. त्याच वेळी प्रलय आलेला आहे. एक मिनिटाच्या आत मध्ये सर्व काही बदलून जात.
प्रलय येऊन गेल्यानंतर तीन दिवसांनी तो डॉक्टर शुद्धीवर येतो. तर त्याच्या आजू बाजूला पुरात अडकून मयत झालेल्या लोकांची मृत्यूदेह विचित्र अवस्थेत आहेत. तेवढ्यात हा एकटाच जिवंत आहे. नंतर त्याला समजत की आपण तीन दिवस शुद्धीवर नव्हतो. त्यानंतर त्याला आठवण की आपली बायको आणि मुलगा एवढ्यात कुठे गेले असतील.त्यांचा मृत्यू झाला असेल या धक्क्याने तो पूर्ण गळून पडतो व आत्महत्या करायला जातो. तो आत्महत्या करणार तेवढ्यातच त्याला त्याचा मित्राचं मुलगा भेटतो. तिथून चालु होतो जीवन मरणाचा एक भयाण संघर्ष...
जीवन मृत्यूच्या संघर्षात प्रबळ इच्छाशक्ती जिवंत राहण्याच्या विजयाचा पाया आहे. जगण्यासाठी मृत्यूशी संघर्ष केलेल्या अनेक लोकांनी अश्या प्रकारचा संघर्ष नक्कीच केला असेल. त्यांना हे पुस्तक वाचून आपला संघर्ष नक्कीच आठवेल.
सस्पेन्स आणि थ्रिलरने परिपूर्ण रचना असलेली ही कादंबरी आहे, त्यात त्याला सायन्सचे अभ्यासपूर्ण लॉजिक जोडलेले आहेत. ते सर्वकाही थक्क करणार आहे.
सध्या वाढलेल्या आत्महत्या व त्या मागील काही कारणे ही कुठे तरी त्यांच्या मनाला चटका लावून जातात. या गोष्टींचा विचार पेशाने डॉक्टर असलेल्या लेखकाने करून हे लिखाण केलेलं आहे. लेखकाच अस मत आहे की हे पुस्तक वाचून एक जरी माणूस आत्महत्या करण्या पासून परावृत्त झाला तर मी धन्य झालो.
खरच ज्या वेळी पूर्ण पुस्तक वाचून होत त्या नंतर दोन दिवस तरी या मधील कथानकं डोळ्या समोरून हालत नाही.