Kavita A. N. Pedenekaranchya | कविता आ.ना.पेडणेकरांच्या Author: Dr. Anant Deshmukh| डॉ. अनंत देशमुख
प्रा. आ. ना. पेडणेकर यांची कविता जीवनाची विविध क्षेत्रे स्पर्श करणारी, त्यातील व्यस्तता नि व्यर्थता वाचकांच्या समोर आणणारी, समकालीन समाज जीवनातील र्हास पर्व सुरू झाल्याची अनेकविध प्रसंगचित्रे उपहास, उपरोधाच्या सहाय्याने मांडणारी, व यामुळे मानवी जीवनासंबंधी काही मूलभूत प्रश्न पडल्याने अंतर्मुख होऊन चिंतनात्मक बनलेली आहे. अंतर्मुखता नि बहिर्मुखता, चिंतनशीलता नि समाजसन्मुखता, तरल काव्यात्मकता नि समर्थ चित्रदर्शित्व, हे त्यांच्या कवितेचे विशेष आहेत. संवेदनशील वाचकांना एकाचवेळी आनंद देणारी आणि अस्वस्थ करणारी प्रा. आ. ना. पेडणेकर यांची कविता वाचकांना आपलीशी वाटेल, हे नक्की.