Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Kathokath Bharu Dya Pela काठोकाठ भरू द्या पेला By Rahul Ranade राहुल रानडे अदिती हर्डीकर

Regular price Rs. 490.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 490.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Kathokath Bharu Dya Pela काठोकाठ भरू द्या पेला By Rahul Ranade राहुल रानडे अदिती हर्डीकर

“अतर्क्य…. वावटळीत भिरकावला गेलेला पाचोळा पुन्हा पालवी होऊन वाऱ्यावर झुलण्यासारखं हे आयुष्य…. अतर्क्य….. मीना, उन्हात करपून तू सावली धरलीस या दुःस्वप्नावर… पुन्हा मोहरलेल्या तुमच्या आयुष्याला माझी तीट….”
-नाना पाटेकर

“एक उत्तम संगीतकार असणाऱ्या राहुलने व्यसनाच्या अवघड काळातसुद्धा आपल्या आतली सर्जनशीलता हरवू दिली नाही. आव्हानात्मक दिवसांवर यशस्वीपणे मात करत राहुलने आपल्या सर्जनशील वृत्तीने उत्तम काम केलं. या पुस्तकात आपला सर्व प्रवास कोणताही आडपडदा न ठेवता त्याने सांगितलाय, म्हणूनच हे पुस्तक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

मुक्ता पुणतांबेकर

(संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे)


“वाद्यांशी आणि सुरांशी हळुवारपणे खेळणारा राहुल, ‘प्राज’ सारख्या माझ्या कंपनीची फिल्म दिग्दर्शित करणारा कल्पक राहुल, तितक्याच तन्मयतेनं उत्तम पदार्थ बनवणारा सुगरण राहुल आणि यामुळेच की काय, अतिशय स्वच्छंदपणे आपल्या जीवनगाण्याचे वेगळे सूर लावणारा राहुल…अशी त्याची अनेक रूपं मी जवळून पाहिली आहेत. त्याचं हे आत्मचरित्र म्हणजे त्याच्या या बहुरंगी, बहुढंगी आणि सुरेल प्रवासाचा एक सुरेख आलेख आहे, असं मला खात्रीने वाटतं.
-डॉ. प्रमोद चौधरी
(संस्थापक अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज लि.)