Skip to product information
1 of 2

Payal Books

Katharsis | कथार्सिस by Sarika | सारिका

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

घरादारातल्या गावशिवारातल्या, नगराशहरातल्या सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्याची टिपणं काढत; त्याची एक अस्वस्थ करणारी कथा आपल्यासमोर ठेवणारी सारिका उबाळे यांची कविता, केवळ या समाजव्यवस्थेत स्त्रीला असलेल्या दुय्यमत्त्वाविषयी बोलत नाही; तर, तिच्या नखशिखान्त स्त्री असण्याविषयीही बोलते. ही स्त्री कधी घाबरलेली, दबलेली, व्यवस्थेच्या ताणाखाली पिचलेली असते; तर कधी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आसुसलेली, प्रेमाची स्वत:ची अशी व्याख्या तयार करणारी; तर कधी मोकळेपणानं आपल्या शारीर भावभावना व्यक्त करत आत्मभान जागृत करणारी असते. बाईला मन आहे, बाईला तिचं तिचं आकाश आहे, तिची तिची काही स्वप्नं आहेत, हे ती ज्या मोकळेपणानं सांगते; त्याच मोकळेपणानं तिच्या लैंगिक भावभावनांनाही वाट करून देते. पुरुषाच्या मनात शिरू पाहणारी स्त्री आजवर मराठी कवितेत रंगवली गेली होती. पण या संग्रहातील स्त्री ही मनाशरीरानं पुरुषाच्या शरीरात शिरण्याची उत्कट इच्छा व्यक्त करते. बाईच्या लैंगिक प्रेरणांविषयी अतिशय तरल शब्दात; पण अगदी मोकळेपणानं ती बोलते. मुक्त सळसळतं चैतन्य मनाशरीरात साठवणाऱ्या स्त्रीचं स्वप्न पाहणारी ही कविता इथंच थांबत नाही; तर, ती स्त्रीबरोबरच एकूणच मानवजातीला म्हणजेच त्याच्यातल्या मूलपणाला आणि या मूलपणातून उगवून येणाऱ्या प्रगल्भ स्त्रीपुरुषांना समाजनिर्मित दहशतींपासून मुक्त करण्याची आकांक्षा बाळगते. दहशत मग ती निष्पाप मुलांचं जगणं झाकोळणारी असेल किंवा पुरुषसत्तेनं स्त्रीच्या आयुष्यात आणलेली असेल, या दहशतीचा निषेध करतानाचा ती दहशत माणसाच्या आयुष्यातून उखडून टाकण्याची भाषा करते. सारिका उबाळे यांची कविता त्या अर्थानं एका पारंपरिक समाजाचं चित्र नाकारून नव्या युगाच्या नांदीची शक्यता वर्तवते.