Payal Book
Karnpatni by kavita rane
Regular price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 450.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
विवाह होण्यापूर्वी कुंतीला सूर्यापासून प्राप्त झालेला पुत्र म्हणजे कर्ण. तिने जन्मत:च त्याचा त्याग केला. एका सारथ्याने त्याचे संगोपन केल्यामुळे, राजकन्येच्या पोटी जन्माला येऊनही त्याला हीन कुळात वाढावं लागलं; ‘सूतपुत्र’ म्हणून जीवन व्यतीत करावं लागलं. क्षत्रिय राजकन्या उरुवी स्वयंवराच्या वेळेस सामाजिक विषमतेचा विचार न करता अर्जुनाला डावलून कर्णाची निवड करते. कर्णाच्या कुटुंबाकडून स्वीकारलं जावं यासाठी उरुवीला आपलं बुद्धीचातुर्य पणाला लावावं लागतं. पुढे ती कर्णाची कणखर कणा बनते. उरुवीच्या भूमिकेतून मांडणी केलेली ही कथा आहे. महाभारताच्या-कौरव-पांडवांच्या विस्कटलेल्या नात्याच्या आधारे नव्याने कर्ण -उरुवी यांच्यातील प्रेमाची आर्तता आणि सामर्थ्य या पुस्तकात उलगडताना दिसते…
