Karna Mahapurush Ki Khalapurush कर्ण : महापुरुष की खलपुरुष? Madhuri Sapre
महर्षी व्यासांनी महाभारत लिहिल्यावर गेली हजारो वर्षे त्यावर उलट सुलट चर्चा सुरु असून , महाभारताचा व्यापक वेध अजून संपलेला नाही.
हा ग्रंथ महाभारतातील महत्त्वाच्या अशा कर्णावर आधारित आहे. कर्णावर टीकात्मक लेखन करणार्यांनी केवळ अहंकार आणि गर्विष्ठपणामुळेच कर्णाच्या गुणांकडे लक्ष न जाता त्याच्या अवगुणांनी त्याचे नुकसान झाले आहे असा निष्कर्ष लेखकांनी काढला आहे.
अशा या कर्णाच्या समग्र जीवनाचा वेध घेणारा माधुरी सप्रे लिखित कर्ण : महापुरुष कि खलपुरूष? हा ग्रंथ अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे.या ग्रंथाचे दोन भाग असून पहिल्या भागातील २० प्रकरणातून लेखिकेने स्वत: च्या नजरेतून कर्णजीवनाचे अवलोकन केले आहे. तर दुसर्या भागात उपरोक्त लेखकांनी कर्णाच्या रंगविलेल्या जीवनाचा आढावा घेण्यात आला आहे. कर्ण ही व्यक्तिरेखा कायमच वादग्रस्त ठरली आहे. कर्णाबद्दल आजही टोकाची मते घेतली जातात. म्हणूनच लेखिकेला हे शीर्षक ठेवणे संयुक्तिक वाटले असावे. कर्ण ही व्यक्तिरेखा पुढे भारतीय समाजमनाचे प्रतिक ठरली.कर्ण हा नेमका कोण होता, त्याचे निर्णय बरोबर होते कि नाही, या प्रश्नांच्या उत्तरांबरोबरच एकूणच कर्ण समजून घेण्यास हा ग्रंथ नक्कीच उपयुक्त ठरेल.