Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Karmayog by Swami Vivekanand

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

Karmayog by Swami Vivekanand

स्वामी विवेकानंदांची उत्कट इच्छा होती की भारताने आपले पूर्वीचे गौरवाचे स्थान पुनः प्राप्त करून घ्यावे. हे उद्दिष्ट साधण्यासाठी ते नेहमी आपल्या व्याख्यानांतून 'कर्मयोगा'चे महत्त्व सांगत असत. हे पुस्तक कर्मयोगावरील त्यांच्या १८९५-९६च्या हिवाळ्यात न्यूयॉर्क शहरात दिलेल्या प्रसिद्ध व्याख्यानांचा संग्रह आहे. मनुष्याला निष्क्रिय करणाऱ्या तमोगुणाचा नाश करून त्याला ध्येयाभिमुख करावे. 'ऋग्वेदा'तील 'आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च’ या श्लोकाचा आदर्श समोर ठेवून सर्वांनी आत्मज्ञान आणि लोकहित हे दोन्ही साधावी, असे स्वामी विवेकानंदांना अगदी मनापासून वाटत असे आणि हीच शिकवण त्यांनी आपल्या व्याख्यानांतून दिली आहे. त्यांचे स्वतःचे जीवन म्हणजे या ध्येयप्राप्तीचे प्रत्यक्ष उदाहरण; म्हणूनच त्यांच्या शब्दांत अपार शक्ती साठलेली आहे. स्वामी विवेकानंदांची मार्गदर्शक ठरणारी दिव्य आणि ओजस्वी वाणी यांची अनुभूती पुस्तकरूपाने वाचकांना मिळणार आहे.