Payal Books
Karl Marx कार्ल मार्क्स by राहुल सांकृत्यायन / Rahul Sankrityayan
Couldn't load pickup availability
कार्ल मार्क्सच्या प्रभावाची तुलना फक्त येशू ख्रिस्त किंवा
महंमद पैगंबर यांच्याशीच होऊ शकेल. अब्जावधी लोकांच्या
मानसिकतेवर, कल्पनाविश्वावर आणि आशा-आकांक्षांवर
या एका माणसाच्या विचारांनी चक्क राज्य केलं! त्याच्या
विचारांची झिंग आणि प्रेरणा घेऊन लढणारे आणि प्राण देणारे
कोट्यवधी जसे उभे राहिले, तसेच तितकेच लोक त्याचा
संपूर्ण तिरस्कार आणि धिक्कार करत त्याच्या विचारांचा
नायनाट करण्यासाठी त्याविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले
...आणि हे चक्क गेली दीडशे वर्षं चाललं! अजूनही संपूर्ण
कम्युनिझमचा पाडाव केल्याचा दावा जरी पाश्चिमात्य राष्ट्र
करीत असली, तरी जगाला मार्क्सवादाचा विचार कुठे ना कुठे
करावाच लागतो. त्याच्या बाजूने तरी किंवा त्याच्याविरुद्ध
तरी! कोणीतरी म्हटल्याचं आठवतंय, 'एक तर तुम्ही त्याच्या
बाजूने तरी असाल किंवा त्याच्या विरुद्ध; पण त्याच्याकडे
दुर्लक्ष करणं हे अशक्य आहे!'
