PAYAL BOOKS
Karkhana By Abhaykumar Deshmukh (कारखाना)
Couldn't load pickup availability
Karkhana By Abhaykumar Deshmukh (कारखाना)
महाराष्ट्राच्या राजकारणावर साखर कारखानदारीचा मोठा प्रभाव आहे. पूर्वी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग साखर कारखान्यातून जातो, असं म्हटलं जायचं. आता ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांचा आमदारकी अन् खासदारकीचा मार्ग साखर कारखान्यातून जातो, असं म्हणण्याची वेळ आली आहे. आज कारखाने म्हणजे गटातटाच्या राजकारणाचे अड्डे बनले आहेत. अशा गटबाजीला राज्य आणि केंद्र पातळीवरूनही खतपाणी घातले जाते. कारखान्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी होणाऱ्या राजकीय कुरघोड्या, डावपेच, तडजोडी, द्वेषभावनेतून होणारे टोकाचे हेवेदावे, हिंसक कारवाया, इत्यादी गोष्टींमुळे आज ग्रामीण राजकारण ढवळून निघाले आहे. कारखान्यांच्या अवतीभवती चालणाऱ्या याच राजकारणाचे चित्रण करणारी ही कादंबरी…
