Kanusmruti By Geetanjali Bhosale
कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा …
कनुस्मृती
तिला नेहेमी पडणारं ते स्वप्न ….
गजरे माळलेल्या त्या दोघीजणी … तडफडत प्राण सोडणारी ती बाई …
हे सगळं आधीच घडून गेलय का ? हजारो वर्षांपूर्वी ?
काय खरं … काय खोटं तिला काहीच ठरवता येईना !
समर कॅम्प
तो कॅम्पचा शेवटचा दिवस होता हे तिच्या गावीही नव्हतं …. ७ दिवसांपूर्वी जो कॅम्प लवकरात लवकर संपावा म्हणून आभा प्रार्थना करत होती तो आज संपणार होता …. कॅम्प संपतोय या गोष्टीचं आभाला वाईट वाटत होतं आणि याच गोष्टीनी ती स्वतः अचंबित झाली होती ….