Payal Books
kantya (कंट्या) by Ganesh Barge
Couldn't load pickup availability
आपल्या प्रत्येकाच्या वाटेत कुठे ना कुठे येतोच असा प्रवास कंट्याचा आहे जो कधी स्वभावाने मऊ तर कधी कठोर आहे. त्याच्या आयुष्याचा तोच नायक आहे आणि तोच खलनायक सुद्धा आहे. निलंदर एवढा की सायकलवर ड्रायव्हर ठेवणारा हा पहिलाच माणूस असेल.
लहानपणापासून आयुष्याच्या एक एक टप्प्यावर हा मुलगा अनुभवातून बदलत जातो. त्याच्याच धुंदीत जगणारा पण तरीही अनुभवाच्या जोरावर तो चांगल्या वाईट गोष्टींना सामोरे जातो.
या कहाणीला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे. पुस्तक वाचतांना तुम्हालाही तो भेटेन आणि त्याच्या आयुष्याची रूपरेषा तुमच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेली तुम्हाला जाणवेल. असा हा बेधुंद जगणारा कंट्या तुमच्या समोर घेऊन येत आहेत लेखक गणेश बर्गे सर. एका सामान्य मुलाची असामान्य अशी ही कहाणी एका चित्रपटसारखी आहे , त्याच्या मध्यंतरात आपल्या प्रत्येकाला स्वत:मधला कंट्या शोधायचा आहे. म्हणून नक्की वाचावी अशी ही कादंबरी आहे.
