{"product_id":"kamayani-by-girish-jakhotiya-कामायनी-लेखक-गिरीश-जाखोटिया","title":"Kamayani By Girish Jakhotiya कामायनी लेखक गिरीश जाखोटिया","description":"\u003cp\u003eKamayani By Girish Jakhotiya कामायनी लेखक गिरीश जाखोटिया\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकामायनी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमूळ राजस्थानी असलेली कामायनी ही कोची, केरळात जन्मते-वाढते. केरळातील तिची ही पाचवी पिढी. अत्यंत हुशार, कर्तबगार, निडर व तर्कशुद्ध विचार करणारी कामायनी जोधपूरच्या एका उमद्या तरुणाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करते. सासर रूढीवादी असल्याने लग्नानंतर तिचा जीवनसंघर्ष सुरू होतो. या संघर्षाचं मूळ दोन भिन्न प्रकृतीच्या संस्कृती यात रुजलेलं असतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही कादंबरी म्हणजे अशा दोन संस्कृतींमधला टकराव होय. इतिहास आणि परंपरांमध्ये अडकलेलं एक राज्य, तर दुसरं प्रगतिशील विचारांची कास धरणारं!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकामायनी आपला पती, कुंवर आणि घट्ट मैत्रीण चार्वी यांच्या मदतीने स्त्रियांसाठी, तसंच दोन्ही राज्यांतील आदिवासींच्या उत्कर्षासाठी आपलं आयुष्य झोकून देते. तिने जाणीवपूर्वक विकसित केलेलं बहुउद्देशीय, बहुभाषिक, बहुराष्ट्रीय मित्रांचं नेटवर्क तिला विश्वकन्या बनवून टाकतं. मात्र एवढं करून ती समाजाला जात-पात विसरायला लावू शकते का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआदिवासी कल्याणाचं तिचं स्वप्न पूर्ण होतं का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामाजिक कामात येणाऱ्या अडथळ्यांवर, पाय खेचणाऱ्या पुरुषी वर्चस्वावर ती मात करण्यात यशस्वी होते का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनियतीचा न्याय आणि मानवी जिद्द यांमधील अनोख्या जुगलबंदीची संघर्षमय कहाणी… कामायनी!\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50433062011073,"sku":null,"price":380.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Kamayani_By_Girish_Jakhotiya.jpg?v=1784898843","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/kamayani-by-girish-jakhotiya-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b6-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}