समकालीन सामाजिक जीवनातील कुरूपता, वास्तवाची भेदक जाणीव, आत्मभानाचा उत्स्फूर्त उद्गार घेऊन येणारी मरकड यांची कविता एवढ्या वैशिष्ट्यांसाठीच प्रसिद्ध नाही तर, त्यांना स्वतःची एक जीवनदृष्टी आहे. ती सर्वच कवितांतून व्यक्त होते.
ऊन, पाऊस, दुष्काळ, वन , रान, झाड, गाव अशा बहुविध पर्यावरणातून त्यांची कविता भेटते. तेव्हा कवीचे जगण्यातले अनुभव किती व्यापक आहेत, हे समजते. ह्या अनुभवांना आपल्या संवेदनशील मनाने आणि उत्स्फूर्त प्रतिभेने त्यांनी टिपले आहे. बदलत्या नैसर्गिक पर्यावरणाविषयी कवीला कुतूहल आहे आणि खंतही.
माणसाच्या जगण्याचे, त्याच्या भंगणार्या मनाचे आणि अस्वस्थतेचे चित्रण करणारा हा कवितासंग्रह वाचकांना अंतर्मुख करणारा आहे