Skip to product information
1 of 2

Payal Books

Kali Kala काली आणि काला by Jayraj Salgaonkar

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Pulications

काली आणि काला अर्थात कृष्ण हे दोन्ही अवतार दुष्टांचे निर्दालन करून पृथ्वीवर सुशासन प्रस्थापित करण्यासाठी अवतरले.
अहिंसेची, शांततेची पुनर्स्थापना आणि सौख्यदायी नवसर्जनासाठी अपवादात्मक परिस्थितीत हिंसा गरजेची आहे, असा संदेश महाकाली व काला म्हणजेच कृष्ण या अवतारांनी दिला आहे. काली कालाच्या उत्पत्तीपासून त्यांनी जनमानसावर पिढ्यान् पिढ्या उमटवलेल्या अमिट ठशाची विविधांगी कारणमीमांसा शोधणारे तत्त्वचिंतनपर पुस्तक.

लेखकाविषयी :

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, तत्त्वचिंतक व जाणकार लेखक म्हणून जयराज साळगावकर सर्वपरिचित आहेत. 'कालनिर्णय' या विविध भाषांतील जगप्रसिद्ध दिनदर्शिकेचे व कालनिर्णय ब्रॅंडचे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी  विविध वृत्तपत्रांतून स्तंभलेखन केले असून  अर्थशास्त्रीय,  ऐतिहासिक, तत्त्वचिंतनपर अशा विविध विषयांवरील त्यांची पुस्तके गाजली आहेत.

जयराज साळगावकर केंद्र शासनाच्या नियोजन मंडळाचे सन्माननीय सदस्य होते. याखेरीज, अनेक खासगी संस्था व मंडळांच्या समित्यांचे सदस्य म्हणून ते काम पाहतात. त्यांनी गिर्यारोहणाचा छंद जपला आहे. ते चित्रपटप्रेमी व जाणकार असून फिल्म सोसायटीच्या संयोजन समितीचे सदस्य आहेत.