Kaleteel Bharatiyatvachi Chalval By Suhas Bahulkar
‘द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ ही भारतीयत्वाने प्रेरित कलाचळवळ १९२०च्या सुमारास सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अस्तित्वात आली. बंगाल रिव्हायव्हलिस्ट स्कूल या गाजलेल्या कलाचळवळीच्या तुलनेत मुंबईतील ही कलाचळवळ दुर्लक्षित राहिली. प्राचीन काळापासून ते भारतीय आधुनिक कलाप्रवाहापर्यंतचे या चळवळीचे एकमेकात गुंफलेले धागे चित्रकाराच्या मर्मदृष्टीने आणि कलाअभ्यासकाच्या वस्तुनिष्ठतेने सुहास बहुळकरांनी उलगडून दाखवले आहेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतरची भारतातील वास्तववादी कला आणि आधुनिक कला यांच्यातील दुवा म्हणूनही या कलाचळवळीकडे त्यांनी पाहिले आहे. कला आणि संस्कृतीच्या सर्वच अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांना यातून बरेच काही मिळेल.