Payal Books
Kale Rahasya By Makarand Sathe काळे रहस्य मकरंद साठे
Couldn't load pickup availability
Kale Rahasya By Makarand Sathe काळे रहस्य मकरंद साठे
मकरंद साठे यांच्या ‘काळे रहस्य’मधील सर्व महत्त्वाची पात्रे आपापली कल्पितकथा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. या कल्पितकथांमधील अनेक घटना सामायिक आहेत पण प्रत्येक पात्राचा हेतू वेगवेगळा आहे. विविध हेतूंच्या शह-काटशहाचा खेळ येथे आकाराला आलेला आहे. ‘काळे रहस्य’ मधील रहस्यमयता या खेळातून निर्माण झाली आहे.
या रहस्यमय कथानकाला समकालीन समाजाच्या जडणघडणीचा आणि सांस्कृतिक व्यवहारांचा ठोस संदर्भ आहे. सामाजिक-सांस्कृतिक घटितांचे सातत्याने मानसिक कोटींमध्ये रूपांतर होत राहिल्यामुळे ही कादंबरी वाचकाच्या अर्थनिर्णयनक्षमतेला आवाहन करत राहते. सर्जनाची शक्यता धूसर झालेल्या कालखंडात जगण्यातील अर्थपूर्णतेचा वेध घेण्याचे अपयशी ठरणारे प्रयत्न ‘काळे रहस्य’ने अधोरेखित केले आहेत.
रहस्यकथेच्या रूपबंधाचा अर्थपूर्ण उपयोग करणारी आणि मानवी व्यवहार आणि सैद्धान्तिकता यांचा अनुबंध शोधणारी ‘काळे रहस्य’ समकालीन परिस्थितीवरील एक गंभीर भाष्य आहे. त्याचे गांभीर्य, त्याची भेदकता समकालाविषयी आस्थेने विचार करू पाहणाऱ्या वाचकाला आतून आणि खोलवर अस्वस्थ करीत राहते.
– हरिश्चंद्र थोरात
