Payal Books
Kahani Vakpracharanchi By Sadanand Kadam
Couldn't load pickup availability
लिहिण्याला वैभव प्राप्त होते ते त्यात आलेल्या शब्द आणि वाक्यप्रयोगामुळे, हे वाक्प्रचार असतात आपल्या रूढी, परंपरा आणि संकेतांचे प्रतिबिंब. आपलं हे सांस्कृतिक संचित अनेक दप्तरातून विखुरलेलं. मध्ययुगीन पत्रव्यवहार आणि बखरीमधून आलेलं. मोजक्या शब्दांत फार मोठा आशय व्यक्त करणारे हे वाक्प्रचार.. तुमच्या भाषेला डौल आणि भारदस्तपणा बहाल करणारे. पण ते समजपूर्वक आणि सहजपणे यायला हवेत, त्यांचा अर्थ जाणून घेऊन ते वापरायला हवेत.. त्यांच्यापैकी अनेक वाक्प्रचार आज भाषेमधून लुप्त झालेत. काहींचा अर्थ समजत नसल्यानं ते आता वापरात नाहीत. उंट कलावर बसणे, तारवात अर्धी सुपारी, मुंबई होणे, म्हणजे नेमकं काय हे आज बहुतेकांना समजत नाही. आजच्या मराठी वाचकाला 'चारी मुंड्या चीत करणाऱ्या ' अशा साडे तीनशे वाक्प्रचारांची ही वेधक, रंजक कहाणी त्यांना मुळातून संदर्भासहित उलगडून सांगणारी आणि वाचकाला भाषिक समृद्ध करणारी.
