Payal Books
Kafkachi Shevatachi Preyasi By Avadhut Dongare काफ्काची शेवटची प्रेयसी कॅथी डायमन्ट अवधूत डोंगरे
Couldn't load pickup availability
Kafkachi Shevatachi Preyasi By Avadhut Dongare काफ्काची शेवटची प्रेयसी कॅथी डायमन्ट अवधूत डोंगरे
फ्रान्झ काफ्का (१८८३-१९२४) हा जर्मन भाषेत लिहिणारा एक सखोल लेखक होता. त्याने आधुनिक मानवी व्यवहारांमधल्या अनेक अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये जाण्याचं धाडस दाखवणारं लेखन केलं. तुम्ही काफ्काचं काही वाचलं असेल किंवा नसेल, तरीही 'काफ्काची शेवटची प्रेयसी' ठरलेल्या डोरा डायमन्टबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला बहुधा आवडेल. विविध कारणांमुळे काफ्काचं नाव तुलनेने जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे डोराची ओळख करून देताना त्याचा संदर्भ आधी दिला जाणं तसं स्वाभाविक. कुठलीही ओळख करून देताना आपण आधीच्या ओळखीचा एखादा संदर्भ असेल तर शोधतो, तितपत हे मानायला हरकत नाही. तर, हे पुस्तक डोरा डायमन्टचं चरित्र आहे. कॅथी डायमन्ट यांनी लिहिलेलं. आडनावं सारखी असली तरी डोरा आणि कॅथी यांचं रक्ताचं असं नातं नाही.
या पुस्तकाचा सुरुवातीचा बराच भाग काफ्का नि डोरा यांच्या नात्याबद्दलचा, पर्यायाने काफ्काच्या अखेरच्या काळाबद्दलचा आहे. काफ्का चाळीस वर्षांचा असताना मरण पावला. तेव्हा डोरा सव्वीस वर्षांची. होती. तर, काफ्काच्या निधनानंतर डोराच्या जगण्याचा प्रवास कसा झाला, याची कहाणी उर्वरित पुस्तकात आहे. जर्मनीत नाझींनी घातलेला धुमाकूळ, कम्युनिस्ट पक्षाशी आलेला डोराचा संपर्क, मुलगी मरियानसोबतचं तिचं उत्कट नातं, काही काळ सोव्हिएत रशियात वास्तव्य, ज्यू संस्कृतीसंदर्भातल्या तिच्या आस्था, मग दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडमध्ये आश्रय शोधणं, मुलीच्या तब्येतीबाबतची तगमग अशा वाटांनी डोराचं जगणं पुढे गेलं. या प्रवासात काफ्काच्या आठवणी अखेरपर्यंत तिची सोबत करत राहिल्या. त्या आठवणी आणि डोराचं त्यानंतरचं आयुष्य, याचा आलेख 'काफ्काची शेवटची प्रेयसी'मधून वाचायला मिळतो.
