Kadambari : Swaroop Va Samiksha| कादंबरी : स्वरूप व समीक्षा Author: Dr. D. B. Kulkarni|डॉ. द. भि. कुलकर्णी
आस्वाद आणि संशोधन यांना आत्मसात करणारी ही समीक्षा अंतिमत: सर्जनशील समीक्षा आहे. निश्चित साहित्यशाशास्त्रीय भूमिकेमुळे, नव अलौकिकतावादामुळे - तिचा कस वाढला आहे.
कादंबरी हे आधुनिक महाकाव्य आहे, कादंबरीची समीक्षा स्वभावत:च अवघड आहे असे सांगता सांगता द. भि. कुलकर्णी यांनी येथे ‘देवदास’, ‘न आनेवाला कल’ या कादंबर्या कशा अस्तित्ववादी आहेत हे विशद केले आहे; ‘रणांगण’, ‘बळी’, ‘सावित्री’ या कादंबर्यांचे नवे आकलन सादर केले आहे; ‘स्वामी’, ‘गारंबीचा बापू’, ‘चक्र’ या कादंबर्यांतील अनेक त्रुटीही दाखवून दिल्या आहेत; फडके आणि खांडेकर यांच्या मर्यादाही. प्रतिभा, निर्भयता आणि निर्वैरता हे कलावंताप्रमाणे समीक्षकांचेही बलस्थान असते, याचा प्रत्यय ‘कादंबरी : स्वरूप आणि समीक्षा’ या ग्रंथाच्या पानापानांतून वाचकास येईल.