Payal Books
Kadambari Ek By Vijay Tendulkar
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
स्त्री-पुरुष संबंधांचा तटस्थपणे वेध घेणारी कादंबरी... स्त्री-पुरुष नात्याचा एवढा धीट व नि:संकोच शोध मराठी कादंबरीत क्वचितच कोणी घेतला असेल. या नात्याची अपरिहार्यता, सनातन गुंतागंत, पुरुषाचा उर्मट, आक्रमक अहंकार व त्यातून स्पष्ट होणारे त्याचे जन्मजात दुबळेपण व अपुरेपण आणि त्याचबरोबर वरवर दुबळ्या व परावलंबी वाटणा-या स्त्रीचे संयत, स्वयंपूर्ण व स्वयंभू असे आंतरिक सामर्थ्य— विजय तेंडुलकरांचे वैशिष्टय असे की, तत्त्वचिंतकाची भूमिका न घेताही सरळ, साध्या प्रसंगांच्या मालिकांमधून ते या नर-मादी संबंधातील आदिस्तर कधी हळुवारपणे, तर कधी प्रक्षोभक रीत्या उलगडत जातात. खरे तर ही कहाणी आहे एका चौकोनी कुटुंबाची; किंवा त्या कुटुंबाच्या कुटुंबप्रमुखाची, भूकंपाप्रमाणे गदगदून हलवणा-या त्याच्या वासनामय स्वप्नाची, त्याच्यातील हट्टी पुरुषाची. पण तेंडुलकरांच्या स्पर्शाने ही कहाणी होऊन जाते ती सर्वसर्जनशील अशा आदिम स्त्री-शक्तीची.
