Kaahi Kavitasangrahanchya Nimittane|काही कवितासंग्रहांच्या निमित्ताने Author: Yashwant Manohar |यशवंत मनोहर
या ठिकाणी कवींना प्रोत्साहन देणे हे प्रस्तावनेचे प्रयोजन असले, तरी ते एकमेव प्रयोजन नाही. नव्या संग्रहाकडे
पाहण्याची एक निश्चित दृष्टी निर्माण व्हावी व त्यांच्या कवितेतील काव्य आणि विचार याचा वाचकाला आस्वाद घेता
यावा हा या प्रस्तावनांचा उद्देश आहे. यशवंत मनोहर यांच्याकडे स्वागतशील, साक्षेपी व कलात्मकतेने कवीला व वाचकाला बरोबर घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे; याचा प्रत्यय प्रस्तुत प्रस्तावनांतून येतो.
याशिवाय मनोहरांचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे असलेले सामाजिक भान. खोल दु:खाचा तळ ते ढवळून काढतात. निमित्ता-निमित्त्याने लिहिलेल्या प्रस्तावनांनी सजलेले हे पुस्तक म्हणजे मनोहरांचे महत्त्वाचे असे वाङ्मयीन व समीक्षात्मक कार्य आहे.