मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकर म्हणून श्री. ना. पेंडसे यांची ओळख आहे. कोकणचा निसर्गसमृद्व प्रदेश त्यांनी आपल्या लेखनातून प्रभावीपणे चित्रित केला आहे. कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र या विविध वाड्मयाप्रकारांत त्यांनी चौफेर आणि सशक्त लेखन केले आहे. कोकणातील माणसं, वेगवेगळी ठिकाणं आणि संपन्न समुद्रकिनारा याचं सर्जन म्हणजे पेंडसे ऐकून लेखन आहे.
घटना, प्रसंग, निवेदन, संवाद, सहज भाषाशैलीत जीवनानुभव त्यांच्या लेखनात सहजपणे येऊन जातो. रंजनात्मकतेच्या पलीकडे जाऊन स्वत:ला जाणवलेली अनुभवसृष्टी ते आपल्या लेखनातून उभी करतात. जीवनातील नाट्य रेखाटताना निवेदनात तटस्थ तरीही जीवनवेधी अशा चैतन्ययुक्त, जिवंत निवेदनातून जीवनाचे नाट्यमय दर्शन घडवतात.
‘जुम्मन’ हा कथासंग्रह अनेकविध व्यक्तित्वाचा वेध घेणारा असा आहे. यात असणार्या सहाही कथा वेगळा बाज घेऊन येतात. तसेच यातील पात्रं आपलं अस्तित्व कायम जपतात. जगणं आणि भोगणं, दु:खाचं सावट, आपल्याच विश्वात असणं. नसल्यानंतरचं महत्त्व कळणं आदी विषय अत्यंत वेधकपणे यात येतात. मात्र यातील धर्मशाळा या कथेतील एका लावण्यतीचं लावण्य कसं सर्वांना हुरहुर लावून जातं, याचं वर्णन अत्यंत लोभनीय असंच आहे. एकूण जुम्मनमधील सर्वच कथा समाजातील सर्वच कथा समाजातील वास्तवाचं प्रतिबिंब टिपतात.
Jumman | जुम्मन by AUTHOR :- Shri. Na. Pendse
Regular price
Rs. 178.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 178.00
Unit price
per