Jp'S-Bhatakanti Tips By Jayprakash Pradhan
प्रवासाचं वेड कुणाचं आयुष्य कसं बदलून टाकू शकतं याचं उत्तम उदाहरण द्यायचं तर जेपीज्अर्थात जयप्रकाश व जयंती प्रधान दाम्पत्याचं! १९९८मध्ये या दाम्पत्याने युरोपची पहिली सहल केली आणि त्यानंतर झपाटल्यासारखे ते एका मागोमाग एक देश पालथे घालू लागले. आजपर्यंत त्यांनी तब्बल ७८ देशांची सैर केली आहे. या ऑफबीट भटकंतीमधून ‘जेपीज्‘कडे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव जमा झाले. या अनुभवांमधूनच पर्यटनाबद्दलची एक व्यापक दृष्टी निर्माण झाली. सहल प्लॅन करताना कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे त्यांना उत्तमरीत्या समजून आलं. त्यातूनच नियोजनाच्या उपयुक्त टिप्सचं हे पुस्तक साकार झालं आहे.
या टिप्समुळे सहल आनंददायी आणि निर्विघ्न होईल. एक सुजाण पर्यटक म्हणून आपला दृष्टीकोन विकसित होईल. तसंच परदेशात आपण कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या टाळाव्यात याबाबत केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या देशाची प्रतिमाही चांगली ठेऊ शकतो.