Skip to product information
1 of 2

Payal Books

Johar Mai Baap Johar By Manjushri Gokhale

Regular price Rs. 288.00
Regular price Rs. 320.00 Sale price Rs. 288.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
चोखोबा तर कधीपासून या दिवसाची प्रतीक्षा करत होता. दीपमाळ तर कधीच बांधून झाली होती. सगळ्या पणत्यांतून तेलवात घालून झाली, तेव्हा शुक्राची चांदणी आकाशात दिसत होती. दोन्ही दीपमाळांवरच्या सगळ्या पणत्यांच्या वाती त्यानं पेटवल्या आणि क्षणार्धात सारा आसमंत तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाला. त्या गहिया अंधारात त्याची आभा क्षितिजापर्यंत पोहोचली आणि क्षितीजही प्रकाशमान झालं. चंद्रभागेच्या पाण्यावर उठणाया तरंगांमध्ये त्या पणत्यांची लक्षावधी प्रतििंबबं हिंदकळून परावर्तित झाली आणि त्यांच्या तेजानं चंद्रभागा नदीचा कणन्कण जणू थरारला. दोन्ही काठ लख्ख उजळून निघाले. चंद्रभागेचं सगळं पाणी लखलखत होतं आणि चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर अंगभर पणत्यांचं प्रकाशमंडळ लेवून लखलखणाया दोन दीपमाळा उभ्या होत्या. त्या पणत्यांच्या प्रकाशानं चंद्रभागेचं पाणी तेजाळलं होतं. परिसरातल्या साNया अंधकाराला छेदत प्रकाशाची ती रेषा सगळा आसमंत उजळून टाकत होती. अंधकाराला छेदत ती प्रकाशरेषा चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर वसलेल्या पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराच्या गाभायापर्यंत पोहोचली. विठ्ठलाची अवघी मूर्ती उजळली. विठ्ठलाच्या सावळ्या मूर्तीवर तर ते प्रकाशाचे बिंदू अंगभर लेवून जणू दिमाख मिरवीत होते. पूजा बांधण्याच्या आधीच विठ्ठलाची ती सावळी मूर्ती विलक्षण देखणेपणा घेऊन उजळली होती. त्या तेजस्वी कणात न्हाऊन निघालेल्या विठ्ठलाच्या सावळ्या चेहयावर एक विलक्षण हास्य विलसत होतं. काय नव्हतं त्या हास्यात? विलक्षण समाधान, विजयाचा कैफ, लाडक्या भक्ताबद्दलचा ओसंडून वाहणारा अभिमान, त्याचा संकल्प सिद्धीस गेल्याबद्दलचा आनंद आणि चिकाटीनं त्यानं ते काम पूर्ण केलं, त्याबद्दलचं कौतुक!