Skip to product information
1 of 2

Payal Books

Jivanacha Upasak : Karmveer Lohakare Guruji | जीवनाचा उपासक : कर्मवीर लोहोकरे गुरुजी Author: Indrajit Patil | इंद्रजीत पाटील

Regular price Rs. 205.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 205.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

शिक्षणाचा आणि ज्ञानाचा प्रवाह शेवटच्या माणसापर्यंत पोचावा, यासाठी कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. शिक्षणातून बहुजनांचा विकास हेच त्यांचे ध्येय होते.

गौडगांव, ता.बार्शी, जि.सोलापूर या छोट्याशा खेड्यात लोहोकरे गुरुजी यांनी शिक्षणाचे रोपटे लावले. ते रुजविण्यासाठी व ते वटवृक्षात परावर्तित करण्यासाठी गुरुजींनी अहोरात्र श्रम घेतले.

गुरुजींनी बहुउद्देशीय, विविधांगी शिक्षण देणारी संस्था निर्माण केली. शेती हा विषय केंद्रस्थानी ठेवून त्यांनी तंत्रशिक्षणाचीही सोय एका छोट्या खेडेगावात केली.

संस्थेचा व्याप एखाद्या विद्यापीठासारखा वाढवला. छोट्याशा खेड्यात कृषी विद्यापीठाचे महान स्वप्न त्यांनी पाहिले.

हा प्रवास एका जिद्दी व कल्पक अशा सामान्य माणसाचा आहे. शाळेतील गुरुजी ते महर्षी असा प्रवास काही सोपा नव्हता. हा सगळा प्रयत्न जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. श्री इंद्रजीत घुले यांनी हा प्रवास आपल्या ओघवत्या व काव्यमय शैलीत इथे चित्रित केला आहे.

एक आदर्श शिक्षणसंस्थाच नव्हे तर आदर्श ग्रामरचना करणार्‍या गुरुजींचे कार्य प्रसिद्धीविन्मुख आहे. म्हणूनच गुरुजींचे प्रेरणादायी कार्य-कर्तृत्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे