Jitya-Jagtya Katha By Shashikant Roy जित्या-जागत्या कथा । शशिकला राय । अनुवाद : जया परांजपे
Jitya-Jagtya Katha By Shashikant Roy जित्या-जागत्या कथा । शशिकला राय । अनुवाद : जया परांजपे
प्रेमाच्या जागी वासना, सुखाच्या जागी भोग, शिक्षणाच्या जागी अंधश्रद्धा, तर्काच्या जागी झपाटलेपण, धर्माच्या जागी ढोंग कशी कोणती आहे ही संस्कृती जिथं माहितीसुद्धा विस्फोटक आहे आणि संस्कृती आहे बॉम्ब? इथं आजच्या स्त्रीनं कसं जगावं? म्हणून मग ती नवीन जग उभं करते. नवीन प्रश्न उभे करते. हे प्रश्न किती तात्त्विक आणि गरजेचे आहेत याची पूर्ण जाण शशिकलाजींना आहे. म्हणून स्त्री ‘विमर्शा’च्या मातृमुखावर क्लांती आणि घामाच्या रेषा स्पष्टपणे उमटतात.
फ्रान्समधल्या क्रांतीने लोकशाहीच्या ‘स्वातंत्र्य’ व ‘समता’ यांच्या जोडीने ज्या ‘बंधुता’ सूत्राची घोषणा केली होती, त्याचा स्त्रीवादानं पूर्ण विस्तार वर्ग, वर्ण, जात, धर्म इत्यादींच्या संकुचित सीमा उल्लंघून ‘भगिनीभावा’च्या रूपात केला. शशिकला राय यांचं ‘जित्या-जागत्या कथा’ हे पुस्तक या गोष्टीचं असं लखलखीत उदाहरण आहे की मीरेच्या प्रेमवेलीप्रमाणे (काटेरी बंदिस्त कुंपणापलीकडील) ‘भगिनीभावा’ची ही वेल (लोकांना स्वीकृत असो वा नसो) अशी बहरत चालली आहे की तिला आता ‘आनंदफळं’ (जेसुआ) ही येणारच. उत्स्फूर्त उद्गार व समुच्चयबोधकांच्या स्पंदनावर हेलकावत राहणारी शशिकलाजींची आवेगपूर्ण व भावोत्कट भाषा अशा या आनंदातिरेकाची साक्ष पटवून देते. हा आनंद दीर्घकाळ चिकित्सक शोध घेतल्यानंतर जीवनाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या नियतीच्या विचित्र खेळाशी संघर्ष केल्याचं हे गमक गवसल्यावर मिळतो की स्वतःच्या दुःखातून सुटका करून घ्यायची असेल, तर दुसऱ्यांची दुःखं दूर करण्याचा प्रयत्न सुरू करा. मनोबल वाढवणाऱ्या गोष्टी सांगणं, प्रेरणादायी कथांची मशालयात्रा काढणं हे याच महत् संकल्पाचे भाग आहेत