मॅनेजमेंट… आजच्या युगातला एक महत्त्वाचा शब्द. एकाच शब्दाचे किती वेगवेगळे कंगोरे असतात ना…? अगदी कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनमध्ये करिअर करण्यापासून ते गृहिणीने घर सांभाळण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंटची आवर्जून मदत होते. प्रत्येक माणसाची आपापल्या आयुष्यात स्वत:ची अशी काही स्वप्नं असतात; परंतु ती पूर्ण करायला अनुकूल परिस्थिती असतेच असं नाही.
जगात अशा व्यक्तींची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. तसेच सुख पायाशी लोळण घेत असताना करिअरच्या, व्यवसायाच्या वेगळ्या वाटा चोखाळण्याचं धारिष्ट्यही अनेकांनी दाखवलं. मुख्य म्हणजे त्यात चिकाटीनं आणि जिद्दीनं यशही मिळवलं.
या पुस्तकातून तुम्हाला तुमच्यासारखीच सर्वसामान्य माणसं भेटतील. त्यांचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण हेच की, आपल्या जगण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मॅनेजमेंटची सूत्रंच आपल्यासमोर उभी केली.
प्रख्यात मॅनेजमेंट गुरू एन. रघुरामन यांनी प्रेरणेचा महास्रोतच या साऱ्या व्यक्तींच्या रूपाने वाचकांसमोर खुला केला आहे.
हे पुस्तक कोणासाठी? तर आपल्या स्वप्नांची दुनिया उभी करू पाहणाऱ्या अगदी नवतरुणांपासून ते निवृत्ती घेतलेल्या नव’तरुणांपर्यंत सर्वांसाठीच…!
या पुस्तकात काय वाचाल?
• तुमच्या आवडीचे कार्यक्षेत्र कसे निवडाल?
• तुमच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी व्यवस्थापन सूत्रे
• आधुनिक व्यवसायांच्या प्रेरक जन्मकहाण्या
• ‘मेक इन इंडिया’ आणि आपण