{"product_id":"jeshthansathi-mayechi-sawali-by-ajahar-nadaf-ज्येष्ठांसाठी-मायेची-सावली-संपादक-अजहर-नदाफ","title":"Jeshthansathi Mayechi Sawali By Ajahar Nadaf ज्येष्ठांसाठी मायेची सावली संपादक अजहर नदाफ","description":"\u003cp\u003eJeshthansathi Mayechi Sawali By Ajahar Nadaf ज्येष्ठांसाठी मायेची सावली संपादक अजहर नदाफ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज भारतात असे लाखो ज्येष्ठ आहेत ज्यांना कोणत्याही कौटुंबिक आधाराशिवाय जगावं लागतं आहे. अनेकदा मुलं त्यांच्या उपजीविकेमुळे गाव, शहर सोडून दुसरीकडे राहतात आणि मग अशा वेळी ज्येष्ठ पालक एकटे पडतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजेव्हा आपल्या मुला-बाळांसोबत असण्याची सर्वच दृष्टीने गरज असते, तेव्हाच ते एकाकी होतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशहरी भागांत अशा एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी काही सोयी-सुविधा असतातही पण ग्रामीण भागात अशा मूलभूत सोयी-सुविधांची वानवाच असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा पार्श्वभूमीवर ‘जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान’ने चंद्रपूर जिल्ह्यात ७५ गावांत ज्येष्ठांना उपचार, विरंगुळा आणि सोबत अशा सुविधांसंदर्भात एक पथदर्शी प्रकल्प राबवला. त्या प्रकल्पातील कार्यकर्त्यांच्या अनुभवांचं संकलन म्हणजे हे पुस्तक. आयुष्य जगून उतरणीला लागलेल्या माणसांच्या कथा-व्यथा आणि या प्रकल्पाने सावली दिल्यानंतर त्यांनी अनुभवलेले आनंदाचे क्षण यांचं शब्दरुप म्हणजेच\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eज्येष्ठांसाठी मायेची सावली !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50433070301377,"sku":null,"price":142.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Jeshthansathi_Mayechi_Sawali_By_Ajahar_Nadaf.jpg?v=1784899085","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/jeshthansathi-mayechi-sawali-by-ajahar-nadaf-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%ab","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}