Jankalyani Ahilyabai Holkar By: काशिनाथ मढवी अजित पाटील
मल्हारराव होळकर सतत मोहिमेवर असत तेव्हा सुभेदारीच्या कामाकडं दुर्लक्ष करीत; पण राज्यकारभार पहाण्यासाठी घरातलंच कुणी सक्षम माणूस हवं असं त्याच्या मनानं घेतलं. असं माणूस हुडकताना त्यांच्या डोळ्यापुढं आपल्या सुनेचं, अहिल्याबाईचं नाव आलं. मग त्यांनी मोठ्या विश्वासानं आपल्या या कर्तबगार सुनेवर सुभेदारीची काम सोपवायला सुरुवात केली. अहिल्याबाईनं ती कामं अत्यंत तडफेनं पूर्ण केली आणि आपल्या सासऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरल्या.
मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे दोघंही पेशव्यांचे सरदार होते. अहिल्याबाईचे पती खंडेराव हे त्यांच्या सुभेदारीचं एकमेवर वारस होते. मल्हाररावांना हे एकमेव पुत्र होते. खंडेराव व्यसनी होते. रोज दिवसभरात ते घुटीच्या व्यवसनात असत नाहीतर नाचगाण्यात दंग असत. पुढं एका युद्धात तोफगोळा लागून मृत्युमुखी पडले. तरुण वयात अहिल्याबाईंना वैधव्य आलं. पती निधनानंतर त्या सती जाण्यास निघाल्या होत्या; पण मल्हाररावांनी त्यांना तसं करू दिलं नाही. ते अहिल्याबाईंना म्हणाले "बाळा असा आततायी निर्णय घेऊ नकोस. या पुढं तूच माझा खंडेराव म्हणून राहा. या म्हाताऱ्याला एकाकी टाकू नकोस.'
अkheर आपल्या सासऱ्यांच्या दिनवाणी अर्जवानं त्या पाघळल्या आणि सती जाण्याचा हट्ट सोडून दिला आणि त्या सुभेदारीचं कामकाज बघू लागल्या.
अहिल्याबाई कर्तबगार होत्याच; पण वेळप्रसंगी त्यांनी हातात तलवारही घेतली होती. स्वच्छ कारभारासाठी त्यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही.