Payal Books
Jallianwala Bagh 13 April 1919 – जालियनवाला बाग by Manohar Sonavane
Couldn't load pickup availability
१३ एप्रिल १९१९. बैसाखीचा पंजाबी नववर्षाचा दिवस. ब्रिगेडियर जनरल डायर ५० रायफलधारी शिपायांसह चिंचोळ्या प्रवेशद्वारातून जालियनवाला बागेत शिरला. समोर मैदानात सुरू असलेल्या सत्याग्रही सभेतील निःशस्त्र, निरपराध समुदायाकडे निर्देश करून, त्याला कोणतीही सूचना न देता, बचावाची कुठलीच संधी न देता त्याने आदेश दिला, ‘फायर sss
आणि लष्करी कौशल्याने रायफली धडधडल्या… शेकडो
लोकांचे प्राण गेले.
अमृतसरमधील या निर्दयी घटनेमुळे वसाहतवादी इंग्रजांचा दमनकारी चेहरा उघड झाला. त्यांच्या सभ्यतेची लक्तरं जगात टांगली गेली. ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा ट्रिगर पॉइंट ठरली! भारतातील इंग्रज राजवटीच्या अखेरीची ही सुरुवात ठरली…..
महात्मा गांधी म्हणाले, ‘प्लासीच्या लढाईने ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला, अमृतसर घटनेने त्याला हादरा दिला!” जुलूम, अत्याचाराची ही कहाणी, जी भारतीय स्वातंत्र्याची चेतना बनली.
