Payal Books
Jahanara By Sukumaran, Neha Kale जहांआरा शाहजहान व औरंगजेब यांच्यातील कलहाची साक्षीदार
Couldn't load pickup availability
Jahanara By Sukumaran, Neha Kale जहांआरा शाहजहान व औरंगजेब यांच्यातील कलहाची साक्षीदार
शाहजहानची मुलगी जहाँआरा हिच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. ती सर्व मुघल शाहजाद्यांमध्ये सर्वांत विद्वान होती. कुमारवयातही ती तिच्या सम्राट वडिलांना राज्यकारभार आणि मुत्सद्दीपणाने सल्ले देत असे. आधी आपला पती जहाँगीर आणि नंतर औरंगजेब यांचे कान भरून त्यांना एखाद्या कठपुतळीप्रमाणे नाचवणारी शाहजहानची धूर्त सावत्र आई नूरमहल हिची कारस्थाने हाणून पाडताना जहाँआराने सातत्याने शाहजहान, दारा शुकोह आणि औरंगजेब यांच्यात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले. पर्शियन, संस्कृत आणि इतर अनेक भाषांमध्ये पारंगत असलेल्या जहाँआराने फक्त कुराणच नाही, तर वेद आणि पुराणांचाही अभ्यास केला होता. एके काळी बंगालच्या उपसागरात सागरी व्यापारासाठी सर्वाधिक जहाजांची मालकीण म्हणून तिची ख्याती होती. तथापि, तिचे आयुष्यही प्रचंड भावनिक उलथापालथीचे होते. राजपूत राजा छत्रसालच्या प्रेमात ती खोलवर बुडाली होती; पण तिचे आजोबा, सम्राट अकबर यांनी नियम घालून दिला होता की, मुघल राजघराण्यात जन्मलेल्या स्त्रियांना प्रियकर असता कामा नये, तसेच त्यांनी विवाहदेखील करता कामा नये. तिने एकाकी राहून आपल्या वडिलांची सेवा करत आणि पानिपत नावाच्या एका प्रामाणिक हिजड्याच्या मैत्रीवर अवलंबून राहूनच आयुष्य व्यतीत केले. सुकुमार यांची जहाँआरा आपल्याला अशी गोष्ट सांगते की, जिचा साक्षीदार पानिपत नावाचा हिजडा आहे. तिच्या वैयक्तिक रोजनिशीतून आपल्याला तिच्या भावांच्या संघर्षादरम्यान तिचे आयुष्य कसे नरकाच्या आगीत होरपळून निघत होते, याचे स्पष्ट चित्रण वाचायला मिळते.
