PAYAL BOOKS
Jagtik Darjyache Nivadak 10 Bhautik Shastradnya By Prof. Dr.Sunil Vibhute
Couldn't load pickup availability
Jagtik Darjyache Nivadak 10 Bhautik Shastradnya By Prof. Dr.Sunil Vibhute
थोरामोठ्यांची चरित्रे आपणास नेहमीच प्रेरणा देतात. शास्त्रज्ञांची चरित्रे याला अपवाद नाहीत. जागतिक दर्जाचे अनेक शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्यापैकी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच शास्त्रज्ञांची नावे आपणास माहित आहेत. काही शास्त्रज्ञांचे संशोधन कार्य बहुचर्चित शास्त्रज्ञांच्या संशोधनास तोडीस तोड आहे. परंतु दुर्दैवाने ते दुलर्क्षित राहिले आहेत. त्या शास्त्रज्ञांचा परिचय वाचकांना व्हावा, हा या पुस्तक लेखनाचा उद्धेश आहे. या पुस्तकात शास्त्रज्ञांची चरित्रे रेखाटत असताना १७ व्या शतकापासून ते आजपर्यंत झालेल्या विज्ञानाच्या प्रगतीचा पट उलगडला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक दर्जाच्या निवडक शास्त्रज्ञांमध्ये भारतीय शास्त्रज्ञांचाही समावेश आहे ही अभिमानास्पद बाब आहे. परंतु त्यांची नावे बहतेक वाचकांना माहित नाहीत हे एक वास्तव आहे. त्या भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय या पुस्तकातून वाचकांना होईल. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, पालक, संशोधक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, विज्ञानप्रेमी नागरिक यांना अत्यंत उपयुक्त आहे. या पुस्तकाला सुजाण, अभ्यासू व रसिक वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास वाटतो.
