फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेप घेणारा देश म्हणून आज जग जपानला ओळखते. रद्दीमालाची बाजारपेठ ते जगात सर्वात उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन करणारा देश या त्याच्या प्रवासाचे श्रेय जाते ते त्यांच्या कार्यपद्धतींना. याच कार्यपद्धती जीई, मोटोरोला, टाटासारख्या कंपन्यांनी अवलंबल्या आणि औद्योगिक क्षेत्रात इतिहास घडवला. ही तंत्रं व्यवस्थापन क्षेत्राचा गाभा बनली.
या पुस्तकात नमूद केलेल्या कार्यपद्धती आपल्या व्यावसायिक जीवनात रुजवण्याची व त्यात यशस्वी होण्याची गरज पुस्तकाच्या पानापानातून जाणवते. नवीन उद्योजकांना व्यावसायिक जगात टिकून राहण्यासाठी माहितीचा खजिना या पुस्तकात दिलेला आहे. तसेच व्यवस्थापकीय कार्यातील जे अनुभव यात मांडण्यात आले आहेत ते तरुण व्यवस्थापकांना उपयुक्त ठरावेत असेच आहेत.
व्यवस्थापन कौशल्यातील क्लिष्ट वाटणार्या या संकल्पना या पुस्तकात सहज, सुलभ व ओघवत्या शैलीत सांगितल्या आहेत. या कार्यपद्धती सामान्य व्यावसायिकाने आत्मसात केल्या, तर यशश्री त्याच्या गळ्यात माळ घालेल हे निश्चित.
जगप्रसिद्ध उद्योजकांच्या यशाच्या कार्यपद्धती सांगणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक.
Payal Books
Jagprasiddha Udyojakanchya Karyapaddhati | जगप्रसिद्ध उद्योजकांच्या कार्यपद्धती by AUTHOR :- Jaiprakash Zende
Regular price
Rs. 313.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 313.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
