Jaggu Baggu + 2 Story Geetanjali Bhosle
सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी …
छापा – काटा-तुम्हाला तुमच्याकडचं भूभूचं किंवा मनीमाऊचं पिल्लू खूप खूप आवडतं . पण हे असं तुम्हाला वाटतं ना ! समज त्या पिल्लालाच विचारलं तर ?
जग्गू – बग्गू-एका सुगरण पक्षिणीनं एका घुबडाच्या पिल्लाला आपल्या घरट्यात घेतलं , त्याला आईसारखं प्रेम दिलं आणि वाढवलं तर खरं … पण मोठा झाल्यावर तो त्याच्याच भावांना , आईला तर नाही ना खाणार ?
सच्ची सारण्या-तुम्ही प्रामाणिक असाल .. अगदी खऱ्या खऱ्या मनाचे असल तर तुम्हाला जगात अगदी काहीही मिळू शकतं . नाही खरं वाटतं ? मग वाचा तर !