Jagatil Sarvottam Raja Ch. Shivajimaharaj By: Kashinath Madhavi
जगातल्या सर्व राजांनीही कौतुकांनी निरखावं, जगातल्या सर्व राज्यकर्त्यांनी साक्षेपानं अभ्यासावं नि जगातल्या सर्व विचार साधकांनी सतत स्मरावं असं दैदिप्यमान व्यक्तिमत्व म्हणजे श्री छत्रपती शिवराय! हजारो पानं लिहिली तरी ती अपुरीच पडतील असं हे लोकोत्तर व्यक्तिमत्व त्याची करावी कुठून आणि संपवावी कोठे असा पेच भल्याभल्यांना पडतो. त्यातून ना इतिहासकार सुटले ना बखरकार मात्र शिवप्रभुंच्या तेजानं दिपून गेलेल्या नि त्यांच्या चिंतनात आपलं. अवघं आयुष्य व्यतीत केलेल्या शिवभक्त श्री. काशिनाथ मढवी ह्या इतिहास- अभ्यासकाराने एक सरळ सोपा मार्ग निवडला आणि तो म्हणजे, पुस्तकाच्या माध्यमातून श्री शिवरायांच्या १०० गुणांचा हा महापट वाचकांसमोर मांडण्याचा! श्री छत्रपती हे जगातील सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ राजे कसे हे विशद करण्यासाठी श्री. काशिनाथ मढवी यांनी शिवरायांच्या अद्वितीय इतिहासातून त्यांच्या १०० लोकविलक्षण वैशिष्ट्यांची यादीच वाचकांसमोर सादर केलीय आणि प्रिया लखलखत्या इतिहासाची सोनेरी पानं जक्षासमोर ठेवलीत. आपला अभ्यास नि व्यासंग पणाला लावून द्या शिवभक्ताने सर्व शिवप्रेमींना आणि विचक्षण वाचकांना, ह्या ग्रंथाच्या रूपानं आणखी एक ऐतिहासिक दस्तावेज बहाल केला आहे. अखिल भारतवर्षाच्या लाडक्या अशा शिवबाच्या असामान्य कर्तृत्वाचे पैलू पुन्हा पुन्हा चाळवे, अभ्यासावे, स्मरावे नि लक्षात ठेवावे असा हा वेगळा ग्रंथप्रयत्न! असा वेगळा ग्रंथ साकार करण्याची दृष्टी देणाऱ्या, लाखांच्या पोशिंदा ठरलेल्या श्री छत्रपतींच्या तेजस्वी रूपाला पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन नि त्याची ही श्रध्देय ग्रंथपूजा बांधणाऱ्या श्री. काशिनाथ मढवी यांनाही सलाम !