JADUI VAASTAV जादूई वास्तव BY- अनुवाद: शंतनू अभ्यंकर
जादूची रूपं अनेक. प्राचीन इजिप्तमधले लोक समजत की रात्र होते ती नट देवतेने सूर्यबिंब गिळल्यामुळे. व्हायकिंग जमात समजायची की इंद्रधनुष्य म्हणजे स्वर्गलोकीच्या देवतांचा भूलोकी उतरण्याचा पूल. ह्या कथा जादुई, सुरस आणि चमत्कारिक खास. पण आणखीही एक आगळी वेगळी जादू आहे. ह्या प्रश्नांच्या खऱ्याखुऱ्या उत्तरांच्या पोटात दडलेली, त्यांच्या शोधात दडलेली, विस्मयकारी वास्तवाची जादू. विज्ञान पेश करते ते हे, ‘जादुई वास्तव’.
या पुस्तकात काळ, अंतराळ आणि उत्क्रांतीची स्फुर्तीप्रद उकल आहे आणि कल्पनेत करायचे रम्य प्रयोग आहेत. निसर्गातील घटितांचा प्रचंड पट इथे मांडला आहे. हे विश्व बनलंय तरी कशाचं? विश्वाचं वय किती? त्सुनामी का उठतात? पहिला माणूस आला कुठून? अशा प्रश्नांची ही रोमांचक शोधगाथा. या थरारक शोधात विविध विज्ञानशाखांतून दुवे सांधले जातात आणि वाचकही शास्त्रज्ञांच्या धर्तीवर विचार करू लागतात.
इथे रिचर्ड डॉकिन्स आपल्या शैलीदार भाषेत निसर्ग विस्मय उलगडत जातो. लहान थोर सर्वांनाच, येणाऱ्या पिढ्यापिढ्यांना हा शोध रोचक, रंजक आणि ज्ञानमय वाटेल हे निश्चित.