Payal Books
Its Okay By Jaya Kishori इट्स ओके जया किशोरी
Couldn't load pickup availability
Its Okay By Jaya Kishori इट्स ओके जया किशोरी
आयुष्यात सतत चढ-उतार होत राहतात; योजनेप्रमाणेच सगळं होत नाही. या सत्याचा स्वीकार करणं, ही आपली सगळ्यात मोठी शक्ती असते. पण आयुष्यातल्या समस्या स्वीकारून पुढे जाण्याऐवजी आपण त्या समस्या आणखी मोठ्या करतो. सारं काही कायम ओके नसलं तरी चालतं, हे आपल्याला कधी समजेल ? लोकांना तुमच्याबद्दल गैरसमज आहेत, इट्स ओके; चुका केल्यात, इट्स ओके; योजना फसल्या, इट्स ओके; काही मित्रांचा हात सुटला, इट्स ओके. हे स्वीकारून, त्या अनुभवातून शिकून पुढे प्रगती करायचे प्रयत्न करायला हवेत.
सुप्रसिद्ध आध्यात्मिक आणि प्रेरणादायी वक्त्या, जया किशोरी यांनी या पुस्तकात त्यांचे विचार मांडले आहेत. आपल्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे आणि त्यातून वाट कशी काढायची, हे वाचकांना यातून समजेल. त्या प्रगतीचा पुढचा रस्ता दाखवतात. त्यामुळे लोकांना थोडी शांतता लाभते आणि ते परिस्थितीचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात.शहाणपणाचे भरपूर शब्द, विनोदाची झालर, स्वतःचे अनुभव आणि काही विलक्षण कथा यांतून त्या सांगतात, ‘आयुष्यात समस्या आणि त्रास असतील, तरी इट्स ओके. त्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात.’
