Itihasatil 125 Akhyayika – इतिहासातील १२५ आख्यायिका
Regular price
Rs. 160.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 160.00
Unit price
per
मनोरंजनाबरोबरच प्रबोधन करण्याची क्षमता असलेल्या आख्यायिका, या प्रत्येक भाषेतील लोकवाङ्मयाचा एक अविभाज्य घटक असतो. त्यातून मानवी स्वभावाचे अनोखे दर्शन होते, धर्मग्रंथांचा तत्कालीन समाजावर पडलेला प्रभाव जाणवतो, मानवाच्या सृजनशील क्षमतेची कल्पना येते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनमानसाच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, आदर, अभिमान, अलौकिक, अद्भुत वगैरे बाबी लक्षात येतात. आख्यायिकांमध्ये इतिहास दडलेला असतो. पण संपूर्ण आख्यायिका म्हणजे इतिहास नाही, हे लक्षात ठेवून जर वाचल्या तर त्या निश्चितच मनोरंजक आहेत. यातून गावांना नावे कशी प्राप्त झाली, निरनिराळ्या व्यक्तींचे स्वभावविशेष, त्यांची कल्पकता, कल्पनाशक्तीचा विस्तार अशा अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने समजतात. त्यामुळे लेखक महेश तेंडूलकर यांनी एका वेगळ्या विषयावर लिहिलेले इतिहासातील १२५ आख्यायिका हे पुस्तक मराठी वाचकांच्या दरबारी दाद मिळवून जाईल असा विश्वास वाटतो.