Skip to product information
1 of 2

Payal Books

ITIHAS SANGRAH BHAG 1 V 2 BY D B PARSANIS इतिहास संग्रह भाग १ व २ द ब पारसनीस

Regular price Rs. 1,050.00
Regular price Rs. 1,300.00 Sale price Rs. 1,050.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

ITIHAS SANGRAH BHAG 1 V 2 BY D B PARSANIS इतिहास संग्रह भाग १ व २  द ब  पारसनीस 

पारसनीसांच्या
इतिहास संग्रहाची
उपयुक्तता...

प्रथमत इतिहास संग्रह समजून घेण्याआधी त्याची पार्श्वभूमी तसेच त्याच्या संपादक बाबत समजून घेणे क्रमप्राप्त आहे. मराठ्यांच्या समग्र इतिहास लेखनाची सुरुवात खरतर १९ व्या शतकात झाली असे आपल्याला समजते.
एक काळ होता जेव्हा इतिहासाचार्य वि.का राजवाडे यांनी आपले आयुष्य इतिहास संशोधन साठी दिले..त्यानंतर या क्षेत्रात लोकांची ये- जा सुरू झाली. त्यापैकीच एक म्हणजे श्री. दत्तात्रय बळवंत पारसनीस अर्थात द. ब पारसनीस हे होय..यांचा जन्म जरी १८७० चा असला तरी वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांचे इतिहास लेखनाचे कार्य दिसायला लागले.
महाराष्ट्र कोकीळ पासून झालेली सुरुवात ही पुढे वाढतच गेली. त्यापैकीच एक अमूल्य ठेवा म्हणजे इतिहास संग्रह हे मासिक होय. या पूर्वी भारतवर्ष नावाचे मासिक पारसनीस यांनी काढले होते जे ३ वर्ष चालले. त्यात पंत प्रतिनिधी यांची बखर तसेच होळकर,बावडेकर यांच्या कैफियती आणि जवळपास १६२ लेख या मासिकातून प्रसिद्ध झाले.
या नंतर पुढे १९०८ रोजी इतिहास संग्रह हे मासिक सुरू झाले जे पुढे ८ वर्ष चालले. या इतिहास संग्रह चा मुख्य उद्देश हा ऐतिहासिक कागदपत्रे व माहिती प्रसिद्ध करणे हा होता. या ८ वर्षांच्या कालावधीत मासिकातून अनेक प्रकारची मनोरंजक माहिती तसेच अपरिचित पैलू मांडण्यात पारसनीस कमालीचे यशस्वी झाल्याचे आपल्याला समजते..त्यापैकी विशेष बाब म्हणजे पहिल्यांदा महेश्वर दरबार ची बातमीपत्रे तसेच तंजावर चे राजघराणे सोबत ऐतिहसिक कथा ही त्यात प्रसिद्ध झाली तसेच शिवाजी महाराजांचे पहिले प्रधान शामराज पंडित रांझेकर. मस्तानीचे पत्र, नाना फडणविसांची कैद, पुण्याची टांकसाळ, नादिरशहाची दिल्लीलरील स्वारी, इंग्रजांशीं तह स. १७८१।८२, भोरकसचे देशमुख ढमाले करिणा, संताजी घोरपड्याच्या खुनाबद्दल ह्मसवडकर माने ह्यांच्या बखरीमधील उल्लेख , संताजी घोरपड्याचा खून व खुषखबरखान पदवी, 'माने' ह्या उपनांवाची उत्पत्ति, अशी अनेक अपरिचित, अप्रकाशित अस्सल कागदपत्रे ...
विशेष बाब ही की या मध्ये काही व्यक्ती चित्रे ही सर्वात प्रथम प्रकाशित झाली..जसे की अफजलखान चे चित्र.
या मासिकाचा महिमा म्हणा किंवा त्यांचे अन्य कार्य , पारसनीस यांना १९१३ साली सरकार ने त्यांना रावबहाद्दूर ही पदवी देऊन सन्मानित केले.. अश्या मोठ्या इतिहास संशोधकाचे एक पुष्प म्हणजे "इतिहास संग्रह" होय..
रावबहादूर द. ब. पारसनीस यांनी केलेले बहुताशी लेखन मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित आहे. मराठ्यांच्या इतिहासाच्या कागदपत्रांचा संग्रह, संपादन आणि प्रकाशन करून, सर्वांना मूळ, अस्सल कागदपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. अनैतिहासिक गोष्टींचा प्रतिवाद करून सत्य घटनांना शक्य तितक्या विवेकनिष्ठेनं आणि धैर्यानं सर्वांसमोर मांडले आहे. ग्रंथांत प्रमाणावांचून कोणतीही गोष्ट लिहायची नाहीं हे पथ्य पाळले आहे.
" इतिहास संग्रह " हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.