Payal Books
Islami Sanskruti Aani Pratibhavantanche Sahitya By: Shripal Sabnis
Couldn't load pickup availability
विश्वसंस्कृती बहुधार्मिक असून सर्व धर्मांत मानवकल्याणकारी सत्य आहे. म्हणूनच सर्व धर्मांचा किमान अभ्यास एकात्म सहजीवन जगण्यासाठी आवश्यक ठरतो. परस्परांचे गळे कापण्यापेक्षा गळ्यात गळा घालून जगणेच आवश्यक आहे. त्याशिवाय सहअस्तित्व अर्थपूर्ण ठरणार नाही.
इस्लाममध्ये मानवी कल्याणाची अनेक सूत्रे आहेत. पैगंबरांच्या चरित्रात करुणा, समता, मानवता आहे. त्याशिवाय कोटी कोटी मुस्लीम ५० च्या वर देशांत समाधानाने जगतात कसे? तेव्हा धर्माच्या भिंती ओलांडून इस्लामसह सर्व धर्मांचे अंतरंग पचवणे आवश्यक! विनोबा, साने गुरुजीही इस्लाममध्ये रमले. आपण विश्वनागरिक आहोत. सर्वांचे जीवन शांतता, सहिष्णुता व विवेकाशिवाय आनंदी होणार नाही. बहुसांस्कृतिक एकता हा २१ व्या शतकातील युगमंत्र आहे. याच नव्या जाणिवेतून या ग्रंथाची भूमिका विश्वनागरिकांना सादर !
