Influence Is Your Superpower इन्फ्लुअन्स इज युअर सुपरपॉवर by Zoe Chance Anjali Dhanorkar
Influence Is Your Superpower इन्फ्लुअन्स इज युअर सुपरपॉवर by Zoe Chance Anjali Dhanorkar
चांगल्या गोष्टी घडवणाऱ्या महाशक्तीचा पुनर्शोध
तुम्ही जन्मतःच प्रभावशाली होता - तुमची काळजी घेतली जावी हे लोकांना पटवून देणारे होता; परंतु त्यानंतर तुम्हाला तुमच्या या शक्तीचे दमन करण्यासाठी, नियमांचे पालन करण्यास तुम्हाला शिकवले गेले. तसेच तुमची वेळ येईपर्यंत वाट पाहण्यासाठी आणि तुम्हाला वाटते त्याप्रमाणे न वागण्यासाठी शिकवण्यात आले. जो चान्स या येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील अत्यंत लोकप्रिय विषयांच्या प्रोफेसर आहेत. वर्तनविषयक अर्थशास्त्र, न्यूरोसायन्स आणि मानसशास्त्र या विषयांमधील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. दुसऱ्यात होणारा अर्थपूर्ण आणि परिणामकारक बदल घडवून आणण्याबाबतची क्षमता परत कशी मिळवावी हे त्यांनी या पुस्तकात स्पष्ट केले आहे.
तुम्हाला वाटतो त्या पद्धतीने प्रभाव काम करत नाही. कारण तुम्हाला वाटते त्याप्रमाणे तुम्ही स्वतः विचार करत नाही. पूर्वीच्या काळातील काही चुकीच्या संकल्पना बघा अधिक मागणे याचा अर्थ लोकांच्या नजरेतून उतरणे त्याचाच परिणाम म्हणून वाटाघाटी करण्याबद्दलच्या तुमच्या उपाययोजना तुम्हाला कमी प्रभावशाली बनवतात. अशी एखादी गोष्ट शोधा जी इतरांवर सर्वाधिक परिणाम करते. करिश्मा कसा करायचा ते शिका. नावीन्यपूर्णतेने आणि सहजतेने व्यवहार करा आणि अधिक उशीर होण्यापूर्वीच लोकांमधील दुष्प्रवृत्ती ओळखा.
'इन्फ्लुअन्स इज युअर सुपरपॉवर' हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आयुष्यात, संस्थेत आणि कदाचित इतिहासातदेखील बदल कसा घडवायचा ते शिकवेल. प्रभावाप्रतीचा हा एक असा नैतिक दृष्टिकोन आहे, जो प्रत्येकाचे आयुष्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याची सुरुवात तुमच्यापासून होईल.