Influence | इन्फ्ल्यूअन्स : मने जिंकणाचे मानसशास्त्र
लोक जेव्हा एखाद्या गोष्टीला 'हो' म्हणतात तेव्हा नेमकी कोणती मानसशास्त्रीय प्रक्रिया घडत असते? ही बी रॉबर्ट चाल्डिनी चे या पुस्तक 'इन्फ्लूएन्स' आपल्याला उलगडून सांगत आहेत. रॉबर्ट चाल्डिनी प्रभाव टाकणे आणि मन जिंकण्याची कला या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. व्यवसायामध्ये आणि रोजच्या जगण्यात हे मन जिंकण्याची कला नैतिकदृष्ट्या योग्य प्रकारे कशी वापरता येईल ते चाल्डिनी आपल्याला या पुस्तकाय दाखवून देतात. काही रंजक गोष्टी आणि आपल्याशी जीवनाशी संबंधित उदाहरणांच्या मदतीने चाल्डिनी हा अत्यंत महत्त्वाचा विषय विलक्षण सोपा करून सांगतात, चाल्डिनी यांच मार्गदर्शन असताना या युक्त्यांचा वापर कसा करायचा हे शिकण्यासाठी तुम्ही अत्यंत बुद्धिमान व्यक्ती असण्याची मुळीच आवश्यकता नाही..
यामध्ये तुम्हाला चाल्डिनी यांनी सांगितलेली प्रभावविषयक सार्वत्रिक वापरासाठीची तत्वं शिकता येतील. यामध्ये या आवृत्तीत नवीन संशोधन आणि पद्धतीचा समावेश केलेला असल्याने तुम्ही लोकांचं मन वळवण्यात अधिक कुशल व्हाल. शिवाय तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्यावर प्रभाव टाकण्याच्या अन्य लोकांच्या अनैतिक प्रयत्नापासून स्वतःचा बचाव कसा करावा हेही तुम्ही शिकाल. आपल्याला ही तत्वं ठाऊक आहेत अस तुम्हाला वाटेल पण त्यातले बारकावे तुम्हाला समजले नसतील तर त्यांच्या सामर्थ्याचा फायदा तुम्ही दुसऱ्या कोणालातरी देऊ कराल.
चाल्डिनी यांची मन जिंकण्यासाठीची तत्व:
- परतफेड
- बांधिलकी आणि सातत्य
- समाजमान्यतेचा पुरावा
- आत्मीयता
- अधिकारवाणी
- दुर्मिकता
- एकात्मता
या आवृत्तीत समाविष्ट करण्यात आलेले सर्वात नवे तत्त्व
ही तत्व नैतिकदृष्ट्या समजून घेऊन त्यांचा वापर करणं अगदी सोप आहे. त्या अंमलात आणताना आपण प्रयत्न करतो आहोत असं वाटणारच नाही. डॉ. चाल्डिनी यांच्या पस्तीस वर्षांच्या दीर्घ अनुभवांच्या आधारित, अन्य तज्ज्ञाद्वारे मान्यताप्राप्त शास्त्रीय संशोधनाच्या आधारावर तयार झालेल्या 'इन्फ्लुअन्स नवीन आणि विस्तारीत स्वरूपात या पुस्तकात लोकांच्या वर्तनामध्ये बदल कशामुळे घडून येतो या विषयाबाबतचा तीन वर्षांचा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रामधील अभ्यास समाविष्ट आहे. इतरांना आकर्षित व्हावं यासाठीचं सखोल मार्गदर्शन तुम्हाला या पुस्तकातून मिळेल.