PAYAL BOOKS
In the name of God By Ravu Subrahmanyam इन द नेम ऑफ गॉड Shirish Sahastrabuddhe
Couldn't load pickup availability
In the name of God By Ravu Subrahmanyam इन द नेम ऑफ गॉड Shirish Sahastrabuddhe
खरे गुन्हेगार कोण? खुनी कोण? संशयाची सुई सस्पेन्स कायम ठेवत फिरत राहते, विशाल कॅनव्हासवर : दुबई, दिल्ली, चेन्नई, मदुराई, मुंबई, सिंगापूर, अॅमस्टरडॅम, ऑस्ट्रेलिया असं फिरतं कथानक. पण केंद्रस्थानी तिरुवनंतपुरम नि तिथलं अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर. त्यातल्या अफाट संपत्तीची दंतकथा... सर्वोच्च न्यायालयाची ऑडिट टीम... तिला त्रावणकोरचे माजी संस्थानिक अस्वती तिरुनाल धर्मराज
वर्मांचा सक्त विरोध, देवभक्ती, न्यायालयीन निकाल, राजकारण आणि गुन्हेगारीची वाढती गुंतागुंत! तीन (की चार?) हत्या... एका ऑडिटरचाच खून... दुसरा मृतदेह चक्क मंदिराच्या पवित्र पद्मतीर्थ कुलम तलावात! पुराणवस्तूंच्या तस्करीचा गोरखधंदा, अफाट पैसा, काळे धंदे, कारस्थानांचे ताणेबाणे, एक असफल नि एक सफल प्रेमकहाणी.. भरपूर नि दणकट व्यक्तिरेखा... छोट्याछोट्या नाट्यपूर्ण प्रसंगातून चित्रपटाच्या पटकथेला लाजवणारी वेगवान दृश्यरचना... दरोडा दुबईच्या मॉलमध्ये. पण त्यातली गणेशमूर्ती तमिळनाडूमधल्या मंदिरातली. मुंबई बॉम्बस्फोटांच्या सूत्रधाराचं गूढ. आणि अर्थातच रहस्यकथांच्या उजळ परंपरेप्रमाणे अनपेक्षित व्यक्ती गुन्हेगार असणं! सीबीआयचे कबीर अन् डीजीपी कृष्णन कशी उलगडतात ही रहस्यं??

