Skip to product information
1 of 2

Payal Books

Igin By Mahadeo More

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
महादेव मोरे यांच्या ‘ईगीन’ या नव्या संग्रहातील कथा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन अधोरेखित करतात. काही गंभीर, तर काही गमतीदार अशा त्या कथा आहेत. मूठभर पांढरपेशांच्या सीमित जगाबाहेर दलितपददलितांचे, कष्टकयांचे एक विशाल जग आहे, तर ह्याच जगातील लोकांच्या हर्षखेदाच्या, व्यथाविवंचनांच्या ह्या कथा आहेत. विषय वैविध्य हे ह्या कथांचे वैशिष्ट्य आहे. रानामाळात मजुरांसह घाम गाळणे, मोटार वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायिंव्हग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे व आदी विविध कष्टाची कामे करीत आयुष्य घालविलेल्या लेखकाला आपल्या खडतर जीवनप्रवाहात जी कथाबीजं हाती लागली ती पूर्ण नजाकतीसह त्याने इथे फुलविलेली आढळतात. वाचनीयतेच्या अंगाने जाणाया ह्या कथा केवळ रंजकच नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या आपला सकस व दर्जेदारपणाही सिद्ध करतात. वाचकाला गुंगविणाया, विचार करायला लावणाया व काही वेळा त्याच्या गालांवर स्मितहास्याची रेषा फुलविणाया ह्या कथांनी मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठी सीमा भागातील मातीचा गंध घेऊन आलेली खास भाषा व तीतून उमटलेली ठसठशीत व्यक्तिचित्रे हेही ह्या कथांचे सामथ्र्य आहे. उपमा, अलंकार, प्रतिमा आदींच्या जंजाळात न अडकता साध्या, सरळ व प्रवाही निवेदनशैलीने वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचे लेखकाचे कसबही दाद देण्यासारखे आहे.