PAYAL BOOKS
Ichhamaran By Sangita Bharat Lote (इच्छामरण)
Couldn't load pickup availability
Ichhamaran By Sangita Bharat Lote (इच्छामरण)
इच्छामरण एक सत्यकथा
डॉ.भारत लोटे सर हे अतिशय हुशार, निष्णात, शांत, मनमिळावू व प्रेमळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांना कुणीही आणि कधीही मदतीची हाक मारली तर ते सदैव तत्पर असायचे. अगदी चोवीस तास काम करूनही डॉक्टरांचा चेहरा नेहमी हसरा आणि आनंदी असायचा. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात गरिबांचा डॉक्टर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य त्यांनी खरे करुन दाखविले होते. त्यांच्या याच रुग्णसेवेची पोचपावती म्हणून शासनातर्फे २००५ साली त्यांना मानाच्या आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ज्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असताना रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजून आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना वाचवण्यासाठी घालवलं, त्याच व्यक्तीला त्याच्या आजारपणात हॉस्पिटलच्या चुकीच्या ट्रिटमेंटमुळे आणि सरकारच्या मदतीच्या अनास्थेमुळे एवढ्या मोठ्या लोकशाही देशात इच्छा मरण मागावे लागणे यासारखी दुसरी शोकांतिका नाही…
