Payal Books
Hussainbhai Batadya | हुसेनभाई बाताड्या Author: Arun Jakhade|अरुण जाखडे
Couldn't load pickup availability
खेड्यापाड्यातला प्रत्येक माणूस वैशिष्ट्यपूर्ण असायचा.
प्रत्येकाचा स्वभाव, सवयी, बोलणं, देहबोली
अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या असायच्या.
आनंद आणि सुख-दु:खाच्या व्याख्या आणि अपेक्षाही वेगवेगळ्याच.
हुसेन असाच एक वेगळा माणूस, तो मनाने निर्मळ आहे.
कुटुंब एकत्र असावं आणि गाव कुटुंबासारखं असावं
एवढीच त्याची अपेक्षा. यात कुठं अडसर निर्माण झाला
की व्यथित होणारा साधा माणूस.
सामाजिक सौख्यभावाचं स्वप्न पाहणारा, मुलांना आणि मोठ्यांना
गप्पा-गोष्टींत रमवणारा हुसेन थापा मारतो
का बाता मारतोय, याचाच चकवा व्हायचा.
या गुणांमुळेच तो सर्वांनाच प्रिय होता. हवाहवासा वाटायचा.
आपल्या आयुष्यातील साधारण घटना श्रवणीय करणारा,
निरुद्देशीय गोष्टी सांगणारा हुसेन हाच एका गोष्टीचा नव्हे
तर कादंबरीचाच विषय बनून जातो.
ही त्याच्या आयुष्याची जशी गोष्ट आहे, तशीच ग्रामजीवनातील
एका मुस्लीम कुटुंबाचीही प्रातिनिधिक गोष्ट आहे.
एक वेगळीच कादंबरी वाचल्याचा अनुभव आपणास नक्की येईल.
Information
