Skip to product information
1 of 2

Payal Books

Hridayvikar Nivaran By Shubhada Gogate

Regular price Rs. 266.00
Regular price Rs. 295.00 Sale price Rs. 266.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
हार्ट अटॅक– हृदयझटका म्हणजे यमदूतानं दारावर केलेली टकटक्, अशी समजूत आजपर्यंत होती; आणि ती फारशी चुकीचीही नव्हती. वेगवेगळ्या दुखण्यांनी किंवा आजारांनी दरवर्षी घडणारया एकूण मृत्यूंमध्ये हृदयविकारानं मृत्यू पावणारयाची संख्या सर्वांत जास्त असते. पण आता या यमदूताला दारातच थोपवणं, एवढंच नव्हे, तर चार पावलं मागं पाठवणंही शक्य आहे, असं सांगणारं हे पुस्तक आहे. हृदयविकार कमी करण्यासाठी काय करावं, हृदयरुग्णांची जीवनशैली कशी असावी, हे तर यात आहेच, त्याच्या जोडीला हृदयाला पथ्यकर अशा अनेक पाककृतीही दिलेल्या आहेत. हृदयविकार कमी होऊ शकतो, हे प्रथम अमेरिकन हृदयतज्ज्ञ डॉ.डीन र्ऑिनश यांनी प्रयोगांनी सिद्ध केलं. त्यांच्या कार्यक्रमाशी मिळताजुळता पण भारतीय परिस्थितीत उपयुक्त ठरणारा उपक्रम पुण्यात डॉ. जगदीश हिरेमठ चालवत आहेत. अनेक हृदयरुग्णांनी त्यांच्या या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे. या दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या कार्यक्रमाची माहिती पुस्तकात आहे.